चंद्रपूर - बाळू धानोरकर यांना चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. धानोरकर यांना उमेदवारी नाकारल्याने अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी मारेगाव काँग्रेस कार्यालयाला कुलूप ठोकले. तसेच पक्षाच्या फलकांचाही मोडतोड केली.
चंद्रपूर - आर्णी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने बाळू धानोरकरांना उमेदवारी नाकारली, कार्यकर्त्यांची नाराजी - congress
बाळू धानोरकर यांना चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
युतीचे सरकार असूनही आपल्या मतदार संघात विकासकामे करता येत नाहीत अशी जाहीर खंत मागील २ वर्षांपासून धानोरकर बोलून दाखवत आहेत. त्याचबरोबर आपण लोकसभा लढविण्याची मानसिक तयारी केली असल्याचे ते म्हणाले होते. त्यामुळे धानोरकर शिवसेना सोडून काँग्रेस पक्षाचा ध्वज हाती घेऊन चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले होते. त्या दृष्टीने त्यांनी तशी व्यूहरचनाही केली होती. यवतमाळ, चंद्रपूर, मुंबई व दिल्ली येथे त्यांच्या याबाबतीत काँग्रेस श्रेष्ठीसोबत बैठकाही झाल्या होत्या. त्यांना काँग्रेसची उमेदवारी घोषित होणार म्हणून या मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली होती. परंतु, ऐनवेळी काँग्रेसने विनायक बांगडे यांची उमेदवारी जाहीर करून कांग्रेस कार्यकर्त्यांचा हिरमोड केला आहे.