चंद्रपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निघालेल्या महाजनादेश यात्रेला चंद्रपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आहेत. जनता कॉलेजच्या चौकात यात्रा आल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अचानक आपल्या खिशातील काळे झेंडे बाहेर काढून निषेध व्यक्त केला. पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर या कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतले आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे; पोलिसांनी घेतले ताब्यात - महाजनादेश यात्रा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निघालेल्या महाजनादेश यात्रेला चंद्रपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आहेत.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही यात्रा राज्यभरात जाणार असून, याची सुरुवात अमरावती येथील मोझरीमध्ये करण्यात आली. सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवले आहेत.
नागपूर, गडचिरोलीनंतर आज मुख्यमंत्री चंद्रपुरात आल्यानंतर त्यांचा ताफा वरोऱ्याकडे मार्गस्थ होताना जनता कॉलेज चौकात ही घटना घडली.