महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrapur Nagar panchayat : नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची एकहाती सत्ता; भाजपला एक नगरपंचायत वाट्याला - चंद्रपूर नगरपंचायत काँग्रेस विजयी

चंद्रपूर जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या (Chandrapur Nagarpanchayat) निवडणुकीत काँग्रेसने (Congress) वर्चस्व राखत एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपला (BJP) केवळ एका नगरपंचायतीवर यश मिळवता आले.

Chandrapur Nagar panchayat
फाईल फोटो

By

Published : Jan 19, 2022, 5:59 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या (Chandrapur Nagarpanchayat) निवडणुकीत काँग्रेसने (Congress) वर्चस्व राखत एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपला (BJP) केवळ एका नगरपंचायतीवर यश मिळवता आले. सिंदेवाही, सावली आणि कोरपना येथून काँग्रेसने बहुमत मिळवले आहे. सिंदेवाही आणि सावली या नगरपंचायत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात येतात. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला. तर पोंभुरणा नगरपंचायत ही राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात येते, येथे भाजपने 17 पैकी 10 जागा मिळवून बहुमत सिद्ध केले आहे.

असा आहे निकाल

सिंदेवाही (काँग्रेस)
एकूण जागा १७
काँग्रेस- १३
भाजप-३
अपक्ष- १

सावली (काँग्रेस)

एकूण जागा १७
काँग्रेस-१४
भाजप- ३

जिवती नगरपंचायत (संमिश्र)

एकूण जागा - १७
काँग्रेस- ६
राष्ट्रवादी-६
गोंडवाना गणतंत्र पक्ष-५

कोरपना (काँग्रेस)

एकूण जागा १७
काँग्रेस- 12
आघाडी-4
इतर -1

गोंडपिंपरी (संमिश्र)

एकूण जागा-१७
भाजप-४
काँग्रेस-७
सेना-२
राष्ट्रवादी -२
अपक्ष -२

पोंभुर्णा (भाजप)

एकूण जागा १७
भाजप- १०
शिवसेना- ४
वंचित -२
काँग्रेस -१

ABOUT THE AUTHOR

...view details