चंद्रपूर- निवडणूक जवळ आल्या की भाजपला राम मंदिर आठवते. मात्र, भाजप राम मंदिर बांधणार नाही. विशिष्ट समाजाची मते स्वत: कडे वाढविण्यासाठीच भाजपला राम मंदिराची आठवण होते, अशी टीका काँग्रेसचे राजूरा विधानसभेचे उमेदवार सूभाष धोटे यांनी केली. ते गोंडपिपरी येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.
राजूरा विधानसभेचे उमेदवार सूभाष धोटे यांचे भाषण हेही वाचा - सरकारच्या नाकर्तेपणाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाईन - डॉ. विश्वास झाडे
राजूरा विधानसभा मतदारसंघाचे वातावरण आता तापू लागले आहे. प्रचाराच्या गाड्या धावत सूटल्या असतानाच नेते मंडळीही आता एकमेकांवर तोफ डागू लागले आहेत. गोंडपिपरी येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलेले काँग्रेसचे उमेदवार सूभाष धोटे यांनी युती सरकारला धारेवर धरले. सरकारने जनतेची फसवणूक केल्याची टीका धोटेंनी केली.
हेही वाचा - चंद्रपुरात शासकीय नोकरदारांना आवास योजनेचा लाभ, खरे लाभार्थी वंचित
यावेळी काँग्रेसचे तालूका अध्यक्ष तूकाराम झाडे, राष्ट्रवादीचे सूरज माडूरवार, नगराध्यक्ष सपना साकलवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूरेश चौधरी उपस्थित होते.