महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 421 जणांची कोरोनावर मात - चंद्रपूर जिल्हा बातमी

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये 277 जणांना कोरोना झाला असून, 421 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या 2 दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकूण आकडा 14 हजार 861 वर पोहचला आहे.

Chandrapur district corona updet
दोन दिवसांमध्ये 421 जणांची कोरोनावर मात

By

Published : Oct 26, 2020, 9:54 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यात रविवारी 215 व सोमवारी दिवसभरात 206 असे गेल्या दोन दिवसांमध्ये 421 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून, रविवारी तीन तर सोमवारी दोन जणांचा मृत्यू झाला. तर 277 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

रविवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्ड येथील 65 वर्षीय महिला, नागभिड तालुक्यातील नवखळा येथील 89 वर्षीय पुरुष, वरोरा शहरातील टिळक वार्ड येथील 57 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर सोमवारी चंद्रपूर शहरातील नगीनाबाग येथील 77 वर्षीय महिला आणि गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी येथील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 222 बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 209, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली चार, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 14 हजार 861 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 11 हजार 860 झाली आहे. सध्या 2 हजार 779 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 15 हजार 738 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 99 हजार 501 अहवाल निगेटीव्ह आले आहे.कोरोनाची साखळी पूर्णपणे खंडित व्हावी यासाठी नागरिकांनी केवळ अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडावे. बाहेर पडताना तसेच सार्वजनिक ठिकाणी सदैव मास्कचा वापर करावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या

जिल्ह्यात रविवारी नव्याने कोरोनाची लागण झालेल्या 188 बाधितांमध्ये 121 पुरुष व 67 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 85, पोंभुर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील आठ, चिमूर तालुक्यातील चार, मुल तालुक्यातील 9, गोंडपिपरी तालुक्यातील चार, कोरपना तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील 16, नागभीड तालुक्यातील 14, वरोरा तालुक्यातील 9, भद्रावती तालुक्यातील 12, सावली तालुक्यातील एक, सिंदेवाही तालुक्यातील 12 तर गडचिरोली येथील 9 असे एकूण 188 जणांचा समावेश आहे. तर सोमवारी बाधित झालेल्या 89 जणांमध्ये 51 पुरूष व 38 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 54, चिमूर तालुक्यातील एक, मुल तालुक्यातील एक, जिवती तालुक्यातील तीन, कोरपना तालुक्यातील सहा, ब्रह्मपुरी तालुक्यातील 18, सिंदेवाही तालुक्यातील दोन, राजुरा तालुक्यातील एक, गडचिरोली दोन, यवतमाळ येथील एक असे एकूण 89 जणांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details