चंद्रपूर - ब्रह्मपुरी तालुक्यातील कृषक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय चौगान येथील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निखिल रवींद्र बुराडे (वय.१८) असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
धक्कादायक: महाविद्यालयीन विद्यार्थ्याची वर्गातच आत्महत्या, चंद्रपुरातील घटना - college student commits suicide
चंद्रपूर जिल्ह्यातील कृषक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
महाविद्यालयिन विद्यार्थ्याने वर्गातच केली आत्महत्या
निखिल याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही. तो एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2020, 11:41 PM IST