महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकारी कार्यालय आणि 'झेडपी'त कोरोनाचा शिरकाव; पुढील तीन दिवस कार्यालये बंद - chandrapur corona news

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना विभागातील तीन लिपिकांचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. जिल्हा परिषदेत ब्रह्मपुरीहून बदलीप्रक्रियेसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. या दोन्ही महत्त्वांच्या कार्यालयांत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही कार्यालयांचे सॅनिटायझेशन सुरू आहे.

corona in chandrapur
जिल्हाधिकारी कार्यालय आणि 'झेडपी'त कोरोनाचा शिरकाव; पुढील तीन दिवस कार्यालये बंद

By

Published : Aug 1, 2020, 9:27 AM IST

चंद्रपूर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापन विभागातील तीन लिपिकांचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. जिल्हा परिषदेत ब्रह्मपुरीहून बदलीप्रक्रियेसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याचाही अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. या दोन्ही महत्त्वांच्या कार्यालयांत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही कार्यालयांचे सॅनिटायझेशन सुरू आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेण्यात आले असून कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापन विभागातील एका लिपिकास कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्याचा स्वॅब घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील दोन लिपिकांचेही स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकांच्या संपर्कातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू करण्यात आहे. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी कार्यालय सॅनिटायझेशन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना गृह विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वीच बदलीप्रक्रिया राबवण्यात आला. यासाठी ब्रह्मपुरीहून जिल्हा परिषदेत आलेला एका कर्मचाऱ्याचा स्वॅब गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह निघाला. हा कर्मचारी नागपूरहून आला होता. त्याला बदलीप्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नव्हते.

मात्र, तो काही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेचे दोन्ही प्रवेशद्वार शुक्रवारी बंद करण्यात आले. इमारत सॅनिटाइझ करण्याचे काम सुरू असून तीन ते चार दिवस मिनी मंत्रालय बंद राहणार आहे.

जिल्हा परिषदेने २३ ते २६ जुलै रोजी बदलीप्रक्रिया राबवली. बदलीप्रक्रियेत ब्रह्मपुरी पंचायत समितीतील एका कर्मचाऱ्याचा समावेश होता. तो जवळपास तीन महिने नागपुरात होता. बदलीप्रक्रिया असल्याने तो नागपूरहून थेट चंद्रपूर जिल्हा परिषदेत आला. त्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला मिळाली. त्यामुळे त्याला बाहेरुनच परत पाठवण्यात आले होते. यादरम्यान तो काही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला.

चंद्रपूरहून त्याने ब्रह्मपुरी गाठले. तेथे संबंधित अधिकाऱयाला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. २९ जुलै रोजी त्याचा स्वॅब नमुना तपासणीस घेण्यात आला. त्याचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. तो जिल्हा परिषदेत आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी इमारत सील करण्यात आली आहे. बाहेरुन येणाऱ्यांना प्रवेश बंद आहे. पुढील दोन-तीन दिवस जिल्हा परिषद बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details