महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cold Ward Room In Chandrapur : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी चंद्रपुरात 'कोल्ड वॉर्ड रूम'; 'ही' आहेत उष्माघाताची लक्षणे - Cold Ward Room In Chandrapur

दररोज वाढत्या तापमानामुळे सामान्य जनता बेजार झाली आहे. अशावेळी उष्माघातामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. याबाबत मनपाने हिट ऍक्शन प्लान तयार केला असून या अंतर्गत चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात ( Chandrapur Medical College ) 'कोल्ड वॉर्ड रूम' तयार ( cold ward room in Chandrapur ) करण्यात आली

Cold Ward Room In Chandrapur
चंद्रपुरात कोल्ड वॉर्ड रूम

By

Published : Apr 27, 2022, 4:51 PM IST

चंद्रपूर- चंद्रपुरात दिवसेंदिवस तापमान उच्चांक ( Chandrapur Temperature ) गाठत आहे. दररोज वाढत्या तापमानामुळे सामान्य जनता बेजार झाली आहे. अशावेळी उष्माघातामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. याबाबत मनपाने हिट ऍक्शन प्लान तयार केला असून या अंतर्गत चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात ( Chandrapur Medical College) 'कोल्ड वॉर्ड रूम' तयार ( cold ward room in Chandrapur ) करण्यात आली असून तिथे रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

चंद्रपुरात 'कोल्ड वॉर्ड रूम' - डॉक्टरांची प्रतिक्रिया

उष्माघातापासून वाचण्यासाठी कोल्ड रूम - चंद्रपूर शहराचा पारा आता 46 डिग्री पर्यंत गेला आहे. त्यामुळे बाहेर निघताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशावेळी उष्माघाताचा फटका बसण्याची दाट शक्यता असते. अशा रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी वार्ड क्रमांक 12 येथे ही कोल्ड वॉर्ड रूम तयार करण्यात आली आहे. ज्याचा प्रभार डॉ. प्रसाद पोटदुखे यांना देण्यात आली आहे.

कोल्ड वॉर्ड रूमची खासियत - या वॉर्डात तापमान कायम थंड राहावे यासाठी कुलर्स लावण्यात आली आहेत. तसेच खिडक्यातुन सूर्यप्रकाश आणि उन्हाच्या झळा पोचू नये यासाठी तिथे लाकडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. ज्यांना उष्माघाताचा फटका बसला किंवा तशी लक्षणे आढळली त्यांना या वॉर्डात आणले जाते. सर्वप्रथम रुग्णाची तपासणी केली जाते. उष्माघातात शरीराचे तापमान 102 डिग्रीपर्यंत पोचते. अशा रुग्णांचे तापमान कमी करण्यासाठी सलाईनच्या माध्यमातून पॅरासिटोमोल दिले जाते. त्यामुळे त्याचा ताप कमी होण्यास मदत होते. तसेच रुग्णाच्या स्थितीनुसार अन्य उपचार देखील केले जातात असे डॉ. प्रसाद पोटदुखे यांनी सांगितले.

ही आहेत उष्माघाताची लक्षणे -जास्त वेळ उन्हाच्या थेट संपर्कात आल्याने उष्माघात होऊ शकतो. अशक्तपणा, डोकेदुखी, ताप, मळमळ, उलटी होणे, चक्कर येणे ही त्याची प्राथमिक लक्षणे आहेत. ते टाळण्यासाठी कमीत कमी बाहेर घराबाहेर पडणे, बाहेर पडताना स्वतःच शरीर पूर्णपणे झाकणे, निंब शरबत, ताक, लस्सी, आंबील आशा शितापेयांचे सेवन केल्याने उन्हापासून स्वतःचे संरक्षण केले जाऊ शकते असे डॉ. प्रसाद पोटदुखे यांनी सांगितले.

हेही वाचा -Hawala racket Aurangabad : औरंगाबादमध्ये तांदूळ व्यापाऱ्याच्या दुकानात हवाला रॅकेट, 1 कोटी रुपये जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details