चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष (Human Wildlife Conflict) दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच काल माजरी येथील नागरी वस्ती एका वाघाने कोळसा कंपनीत (Coal Company employee dies in tiger attack) काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ठार (Tiger killed coal employee Chandrapur) केले. विशेष म्हणजे, मांजरी परिसराच्या लोकवस्तीत गेल्या अनेक दिवसांपासून दोन वाघांचा मुक्त संचार (Free Movement of Tigers) आहे. त्यात एका वाघिणीला बछडे असल्याचे समजते. असे असताना देखील वनविभाग या वाघांना जेरबंद करण्यात रूची दाखवत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (Latest news from Chandrapur)
Tiger Attack : घरामागे लपलेल्या वाघाने केला अचानक हल्ला, कोळसा कंपनीचा कर्मचारी ठार - मानव वन्यजीव संघर्ष
जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष (Human Wildlife Conflict) दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच काल माजरी येथील नागरी वस्ती एका वाघाने कोळसा कंपनीत (Coal Company employee dies in tiger attack) काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ठार (Tiger killed coal employee Chandrapur) केले. विशेष म्हणजे, मांजरी परिसराच्या लोकवस्तीत गेल्या अनेक दिवसांपासून दोन वाघांचा मुक्त संचार (Free Movement of Tigers) आहे. (Latest news from Chandrapur)
वाघाने घेतला नरडीचा घोट-मृत 37 वर्षीय दिपू सियाराम सिंग महतो हा खाजगी कंपनीमध्ये कार्यरत होता. रात्र पाळी असल्याने तो राहते घरी न्यू हाऊसिंग कॉलोनी येथून जात होता. त्यावेळी अचानक एका घरामागे दबा धरून बसलेल्या वाघाने दिपूवर हल्ला चढवित त्याला फरफटत झुडपात नेले आणि त्याच्या नरडीचा घोट घेतला. या हल्ल्यात दिपू ठार झाला. नागरिकांना दिपूचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी धाव घेत, शोधाशोध केली असता नाल्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. मागील काही दिवसांपासून तो वाघ वेकोली क्षेत्र व नागरी वस्तीत अनेकांना दिसला आहे. मात्र वनविभाग व वेकोली प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.
वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी-ज्या रस्त्यावरून दिपू कामाला जात होता, त्या रस्त्यावर ग्रामपंचायतने साधे लाईटसुद्धा लावले नाही. त्या मार्गावर गडद अंधार होता. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे दिपू वाघाचा बळी ठरला. नागरी वस्तीमध्ये वाघाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.