चंद्रपूर - शहराच्या मध्यभागी असलेल्या कपड्याच्या दुकानात बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधीचा माल जळून खाक झाला. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
शहरातील छोटा बाजार चौकातील जया कलेक्शन नावाचे ३ मजली इमारतीचे मोठे दुकान आहे. या दुकानाला बुधवारी रात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, यादरम्यान संपूर्ण माल जळून खाक झाला. या दुकानातील साहित्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. दुकानाच्या मालकाचे नाव पंकज मंगाणी असून दुकानाला आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.