महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाच स्वीकारणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ अटक - चंद्रपूर गुन्हे बातमी

सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सेवानिवृत्त असलेल्या तक्रारदाराला वरिष्ठ सहायक या पदावर असलेल्या अमरप्रेम जुमडे याने 3 हजारांची मागणी केली. तो पैशासाठी त्रास देत होता. याबाबत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

Clerk arrested for Bribe accepted
लाच स्वीकारणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ अटक

By

Published : Dec 4, 2019, 11:37 PM IST

चंद्रपूर- एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून 3 हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. अमरप्रेम जुमडे, असे या लिपिकाचे नाव आहे.

लाच स्वीकारणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ अटक

हेही वाचा - चिमूर तालुक्यातील १९३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र, मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका

याबाबत अधिक माहिती अशी की, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सेवानिवृत्त असलेल्या तक्रारदाराला वरिष्ठ सहायक या पदावर असलेल्या अमरप्रेम जुमडे याने 3 हजारांची मागणी केली. तो पैशासाठी त्रास देत होता. याबाबत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

हेही वाचा - जप्त केलेल्या 39 लाखाच्या दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला बुलडोजर

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने सापळा रचून लाचखोर कर्मचाऱ्याला अटक केली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या पथकाने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details