चंद्रपूरभारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी इंग्रजांच्या साम्राज्यातून मुक्त होणारं देशातील पहिलं ठिकाण म्हणजे चिमूर शहर. या क्रांतीचा इतिहास History of the Chimur Revolution शहराच्या स्वागतद्वारावर कोरण्यात आला आहे. गेले तीन दिवस संपूर्ण देशात 'हर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tricolor Campaign सुरू आहे. यामुळे सामन्यातील सामान्य माणूस आपल्या घरी तिरंगा फडकवू शकला. मात्र या स्वागतद्वारावर कोणीही देशाचा राष्ट्राध्यक्ष फडकवला नाही. शासकीय आणि प्रशासकीय उदासीनता याला कारणीभूत आहे. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांबाबत ही उपेक्षा आता टीकेचा विषय ठरला आहे.
उठावाची ठिणगी पेटली1942 च्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजन-किर्तनाने चिमूर येथील जनता इंग्रज सरकारविरोधात पेटून उठली. याविरोधात जनतेने मोर्चा काढला, यावर इंग्रज सरकारने लाठीचार आणि गोळीबार केला. यानंतर या उठावाची ठिणगी पेटली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी इंग्रजांच्या चार अधिकाऱ्यांना पूर्वीचे डाकघर आणि आताचे विश्रामगृह येथे डांबले आणि अख्खे डाकघरच पेटवून दिले. हे चारही अधिकारी तिथेच मरण पावले. तर उरलेल्या शिपायांना शहरातील लोहापुल येथपर्यंत आणून पिटाळून लावण्यात आले. यामध्ये यानंतर 16, 17 आणि 18 ऑगस्ट या तिन्ही दिवशी इंग्रज सरकारचा चिमूर येथे कुठलाही मागमूस नव्हता. चिमूर हे स्वतंत्र झाले याची घोषणा खुद्द सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीच्या बर्लिन रेडिओ स्टेशन वरून केली.
21 क्रांतिकारकांना फाशीची शिक्षायानंतर इंग्रज सरकारने येथे लष्कर पाठव हे आंदोलन मोडून काढले. यामध्ये बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार, बाबूलाल झिरे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या प्रकरणात इंग्रज सरकारने 200 जणांवर खटला चालविला. 21 क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, तर 26 जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. या क्रांतीचे स्मारक चिमूर शहराच्या मध्यभागी साकारण्यात आले आहे, तर या क्रांतीचा इतिहास चिमूर शहराच्या प्रवेशद्वावर कोरण्यात आला आहे. दरवर्षी या क्रांतीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी 16 ऑगस्टला येथे कार्यक्रम आयोजित केला जातो. उद्या येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरी प्रत्येक शासकीय कार्यालयात तिरंगा फडकविण्यात आला. मात्र शहिदांच्या क्रांतीचा उजाळा देणाऱ्या प्रवेशद्वारावर तिरंगा फडकविण्यात आला नाही. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्याबाबत अशी अपेक्षा हा टीकेचा विषय ठरला आहे. प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेमुळे जनसामान्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.