महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 8, 2020, 3:15 PM IST

Updated : Jun 8, 2020, 3:31 PM IST

ETV Bharat / state

चंद्रपूर : अडीच लाखांचा अवैध मोहफुलांचा साठा जप्त, चिमूर पोलिसांची कारवाई

गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला कोलारा शेत शिवारात मोठ्या प्रमाणात मोहफुलांचा साठा (सडवा) लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार शोध मोहीम राबवली असता आरोपी येनुदास नामदेव पोहिंकरच्या शेतात १ लाख ६० हजाराचा मोहासाठा (सडवा) व आरोपी गोपीचंद तुलसीदास पोहिंकर याच्या शेतात ८० हजाराचा मोहसाठा असा एकूण २ लाख, ४० हजारांचा मोहसाठा मिळाला.

वाघाच्या गावात अडीज लाखाचा मोह सडवा
वाघाच्या गावात अडीज लाखाचा मोह सडवा

चंद्रपूर - जिल्ह्याच्या चिमूर पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोलारा परिसरात तीन महिन्यांपासून वाघाची दहशत पसरली आहे. गेल्या तीन महिन्यात वाघाने या परिसरात पाच बळी घेतले. त्यामूळे जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्यासंबधी माहीती देत असताना मोहाची दारूनिर्मिती व विक्री करणाऱ्यांनी शेतात मोहाचा साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे धाड टाकली असता दोन शेतात तब्बल अडीज लाखांचा मोहफुलांचा साठा मिळाला.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या कोलारा परिसरात वाघाचा धुमाकुळ सुरू आहे. या परिसरात वाघाच्या दहशतीने शेतकऱ्यांपुढे शेती कशी करावी, हा प्रश्न आवासून आहे. मात्र, याही परीस्थितीमध्ये मोहदारू निर्मिती व विक्री मोठया प्रमाणात केल्या जात आहे. गेल्या तीन महिन्यात वाघाने या परिसरात पाच बळी व एका आठवड्यात दोन बळी घेतले. तेव्हापासून वनविभाग व पोलीस विभागाची गस्त सुरू असून शेतकऱ्यांना सावधगीरी बाळगण्याविषयी माहीती देणे सुरू आहे.

याच दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला कोलारा शेत शिवारात मोठ्या प्रमाणात मोहफुलांचा साठा (सडवा) लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार शोध मोहीम राबवली असता आरोपी येनुदास नामदेव पोहिंकरच्या शेतात १ लाख ६० हजाराचा मोहासाठा (सडवा) व आरोपी गोपीचंद तुलसीदास पोहिंकर याच्या शेतात ८० हजाराचा मोहसाठा असा एकूण २ लाख, ४० हजारांचा मोहसाठा मिळाला.

या प्रकरणी दोन्ही आरोपीवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कार्यवाही उप विभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोहवा डोनू मोहूर्ले, नापोशी दिनेश सूर्यवंशी, पोशी विशाल वाढई यांनी पार पाडली.

Last Updated : Jun 8, 2020, 3:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details