चंद्रपूर -चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या झरी मांगरूढ शिवारात हातभट्टीद्वारे मोहाच्या दारूची निर्मिती करण्यात येत होती. पोलीस पथकाने तपासणी केली असता, एकूण 680 किलो मोहा सडवाचा एक लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. हातभट्टी दारू काढणाऱ्या तसेच वाहतूक आणी विक्री करणाऱ्या एकूण नऊ आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चिमूर पोलिसांकडून देशी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; एक लाख रुपये किंमतीची देशी दारू जप्त - chandrapur desi liquor seized
चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या झरी मंगरूढ जंगल क्षेत्राला लागून असलेल्या शेतशिवारात हातभट्टीद्वारे मोहा दारू निर्मीती होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
लॅाकडाऊन काळात देशी विदेशी दारू विक्री बंद असल्याने हातभट्टीच्या मोहा दारूकडे सर्व अवैध दारू तस्कर आणि तळीरामांचा कल आहे. चिमूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वन क्षेत्र असल्याने त्या आडोशाने मोहा दारू निर्मीती, वाहतूक आणि विक्री सुरू आहे. चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या झरी मंगरूढ जंगल क्षेत्राला लागून असलेल्या शेतशिवारात हातभट्टीद्वारे मोहा दारू निर्मीती होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहीतीच्या आधारे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असता तिथे मोठ्या प्रमाणात मोहा दारू निर्मिती होत असल्याचे निदर्शनात आले.
पोलिसांची चाहूल लागता सर्व आरोपी फरार झाले होते. पंढरी नामदेव चौखे, विठ्ठल मंगरु चौखे, देविदास मंगरू चौखे, देविदास महादेव ईटणकर, अशोक चंपत नेताम, पांडुरंग सूर्यभान कुरसंगे, किशोर गोविंदा कुमरे, यशवंत लहानू आत्राम आणि बापूराव गणेश धुर्वे (सर्व राहणार झरी मांगरूळ) या सर्व नऊ आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस हवालदार विलास सोनुले, नापोशी किशोर बोढे, पोलीस शिपाई सतीश झिलपे, भारत गोडवे, मनोज ठाकरे, शैलेश मडावी यांनी पार पाडली.