चिमूर (चंद्रपूर) - देशासह राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत काहीजण रस्त्यावर विनाकारण शिवाय तोंड न बांधता फिरत आहेत. अशा 'महाभागांना' चिमूर पोलिसांनी गांधीगिरीने उत्तर दिले. अशा एकाची पोलिसांकडून पुष्पहार अर्पण करून उपहासात्मक आरती करण्यात आली.
तोंड न बांधता फिरणाऱ्यांविरोधात चिमूर पोलिसांची गांधीगिरी; हार घालत केली आरती - chimur police chandrapur
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत काहीजण रस्त्यावर विनाकारण शिवाय तोंड न बांधता फिरत आहेत. अशा 'महाभागांना' चिमूर पोलिसांनी गांधीगिरीने उत्तर दिले. अशा एकाची पोलिसांकडून पुष्पहार अर्पण करून उपहासात्मक आरती करण्यात आली.
![तोंड न बांधता फिरणाऱ्यांविरोधात चिमूर पोलिसांची गांधीगिरी; हार घालत केली आरती हार घालत केली आरती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6763697-1007-6763697-1586693532958.jpg)
संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. पण, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना ग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. ही चांगली बाब असली तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तोंडाला न बांधता बेजबाबदारपणे फिरणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिसांनी आता गांधीगिरीचे अस्त्र वापरण्यास सुरुवात केली आहे.
आज सहायक पोलीस निरीक्षक अलीम शेख, शिपाई सोयाम, दगडू सर्वदे, विशाल वाडी, रवी आठवले, अवधूत खोब्रागडे महिला शिपाई कविता कोहळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.