महाराष्ट्र

maharashtra

'बेरोजगारीवर प्रश्न विचाराल तर चोप मिळेल', चिमूर मतदारसंघातील खेड येथील घटना

By

Published : Oct 13, 2019, 1:39 PM IST

चिमूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील मितेश भांगडिया यांच्या सभेदरम्यान गावातील एका तरूणाने बेरोजगारीवर प्रश्न विचारला. मात्र तरूणाच्या या प्रश्नांमुळे भाजप कार्यकर्त्यांचा तिळपापड झाला आणि त्यांनी या तरूणाला बेदम चोप दिला, सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मितेश भांगडिया यांची खेड तिमुर येथे सभा

चंद्रपूर -महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. शनिवारी ब्रम्हपुरी तालुक्यातील खेड येथे भाजपचे उमेदवार किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील मितेश भांगडिया यांनी सभा घेतली होती. यावेळी त्यांच्या भाषणा दरम्यान गावातील एका तरूणाने बेरोजगारीवर प्रश्न विचारला. मात्र तरूणाच्या या प्रश्नांमुळे भाजप कार्यकर्त्यांचा तिळपापड झाला आणि त्यांनी या तरूणाला बेदम चोप दिला, सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मितेश भांगडिया यांनी बेरोजगारी बद्दल प्रश्न विचारल्यानंतर तरूणाला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहान

हेही वाचा... निवडणुकीच्या तोंडावर भाजपला राम मंदिर आठवतेय - सूभाष धोटे

सामान्यतः प्रचार दरम्यान होणाऱ्या सभांमध्ये सामान्य नागरीक जेव्हा प्रतिनिधींना प्रश्न विचारतात, उत्तर नसल्यास काही प्रतिनिधी शांतपणे ते सर्व ऐकण्याची भुमिका घेतात. मात्र कार्यकर्त्यांचा तिडपापड होताना दिसतो. यामुळे क्रोधीत झालेले कार्यकर्ते असे पाऊल उचलताना दिसत आहे. याची प्रचिती चिमूर विधानसभा मतदारसंघातही आली आहे. खेड येथील या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर सध्या संपूर्ण मतदारसंघात याची चर्चा होत आहे.

हेही वाचा...चंद्रपुरात शासकीय नोकरदारांना आवास योजनेचा लाभ, खरे लाभार्थी वंचित

खेड या गावातील युवक प्रतिक डांगे या तरुणाने विधानपरिषदेचे माजी सदस्य मितेश भांगडिया यांना मतदारसंघातील बेरोजगारी बाबत प्रश्न उपस्थीत केला. यावेळी त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहान करण्यात आली. त्यामुळे बेरोजगारीवर प्रश्न विचाराल तर चोप मिळेल, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे का? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. बेरोजगारीवर प्रश्न विचारणारा हा युवक नशेत होता, मात्र त्याने केलेला प्रश्न वास्तव असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून मात्र या तरूणाद्वारे सभा उधडून लावण्याचा डाव विरोधकांनी केला असल्याचा कांगावा सुरु केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details