महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोज शंभर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा; चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा ठराव - Cotton producer farmer trouble

कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे पणन महासंघाची खरेदी रोज 40 ते 50 शेतकऱ्यांची होत आहे. बाजार समितीत कापूस विक्रीसाठी तीन हजार शेतकऱ्यांनी नोंद केल्या आहेत. या तीन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदीसाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो. शासनाने ग्रेडरची संख्या वाढवून रोज शंभर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Agriculture market chimur
कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर

By

Published : May 24, 2020, 5:22 PM IST

चंद्रपूर -चिमूर तालुक्यातील दोन जिनिंगमध्ये महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघातर्फे खरेदी सुरू आहे. मात्र, रोज केवळ 40 ते 50 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे रोज शंभर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे, असा ठराव चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीने केला. हा ठराव बाजार समितीचे सभापती माधव बिरजे यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना कापूस उत्पादक महासंघाला पाठविला आहे.

यावर्षी मान्सून आगमन लवकर होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे पणन महासंघाची खरेदी रोज 40 ते 50 शेतकऱ्यांची होत आहे. बाजार समितीत कापूस विक्रीसाठी तीन हजार शेतकऱ्यांनी नोंद केल्या आहेत. या तीन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदीसाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो. शासनाने ग्रेडरची संख्या वाढवून रोज शंभर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

याशिवाय धान उत्पादक शेतकऱ्यांनी फेडरेशनमध्ये धान विकण्यासाठी नोंदी केल्या आहेत. मात्र, फेडरेशनची खरेदी बंद केल्याने बाजारात कवडीमोल भावाने धान विकावे लागत आहे. त्यामुळे फेडरेशनची खरेदी सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तूर पिकाच्या खरेदीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, आजूनही शासनाने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत तूर खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी सुद्धा खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे याशिवाय फेडरेशन व आदिवासी महासंघामध्ये धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह्य 700 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे बाजार समितीत धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच तारण योजनेत धान ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा सानुग्रहय अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. हे सर्व ठराव बाजार समितीच्या बैठकीत सभापती माधव बिरजे यांच्या अध्यक्षतेखालीघेण्यात आले असून शासनाकडे पत्र पाठविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details