चंद्रपूर - दुर्गापूर परिसरात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल 13 लोकांचा बळी ( 13 deaths due to tiger in Chandrapur ) गेला. यादरम्यान वेकोली परिसरातील झाडझुडुपे स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र वेकोली प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. याच दरम्यान बुधावरी एका नऊ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेले. यामुळे संतप्त झालेल्या भटारकर यांनी वेकोली कार्यालयाची तोडफोड करीत संताप व्यक्त केला.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि दुर्गापूर-नेरी परिसरात वाघ व बिबट्यांच्या ( free movement of leopards in Chandrapur ) मुक्तसंचार आहे. हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात आजवर अनेकांचा जीव गेला आहे. काही दिवसांपूर्वी वीज केंद्रातील कामगाराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर ( NCP leader Nitin Bhatarkar ) यांनी आमरण उपोषण पुकारले होते. भटारकर यांनी तब्बल सहा दिवस आमरण उपोषण केले होते. त्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर भटारकर यांनी उपोषण मागे घेतले. परंतु, उपोषणा वेळी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यानेच बुधवारी दुर्दैवी घटना घडली असा भटारकर यांनी आरोप केला.
झाडझुडपांची साफसफाई केल्याने प्राण्यांनी जागा सोडली-
वनविभाग, सीटीपिएस, वेकोली प्रशासनाला नितीन भटारकर यांनी वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केले. वन विभागाला निवेदन दिल्यानंतर वन विभागाने सिटीपीस प्रशासन व वेकोली प्रशासनाला त्यांच्या हद्दीतील परिसर असलेल्या ठिकाणांची तात्काळ साफसफाई करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. वन विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाने वाघ व बिबट्याकरीता अनुकूल असलेल्या झाडझुडपांची साफसफाई केली असल्यानेच या हिंस्र प्राण्यांनी ती जागा सोडली. त्याचप्रमाणे वेकोलीनेसुद्धा त्यांच्या उपयोगात नसलेल्या जागेची साफसफाई करावे, ही मागणी वारंवार केली होती.
विनंती करूनही भेटण्यास वेळ नाही-