चंद्रपूर- जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसला तरी येत्या 3 मे पर्यंत संचारबंदी तशीच राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार दिले आहेत. चंद्रपुरकरांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत बेजाबदारपणाचे दर्शन घडवले.
चंद्रपूरकरांचे बेजबाबदारपणाचे दर्शन; दुचाकी घेऊन शेकडो नागरिक रस्त्यावर
सोमवारी दुपारच्या सुमारास नागरिक आपली वाहने घेऊन मोठ्या संख्येने मुख्य रस्त्यावर उतरली. यामुळे या नागरिकांना सांभाळताना प्रशासनाची देखील तारांबळ उडाली.या प्रकारामुळे चंद्रपुरककरांच्या बेजाबदारपणाचे दर्शन झाले.
सोमवारी दुपारच्या सुमारास नागरिक आपली वाहने घेऊन मोठ्या संख्येने मुख्य रस्त्यावर उतरली. यामुळे या नागरिकांना सांभाळताना प्रशासनाची देखील तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शासनाचे पुढील आदेश मिळेपर्यंत संचारबंदी कायम राहील अशी माहिती जनतेला दिलेली असूनही नागरिक बाहेर पडल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार उल्लेख नसलेल्या कुठल्याही व्यावसायिकांनी, दुकानदारांनी आपली दुकाने न उघडण्याचे आदेश आहेत,असे असले तरी हा आदेश जुगारून मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. जटपूरा गेट जवळ अक्षरशः ट्राफिक जाम झाला. तिथे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. अनेकजण दुकानात खरेदी करण्यासाठी निघाले होते. अशांना समज देऊन, त्यांची समजूत काढण्यास पोलीस प्रशासनाच्या नाकीनऊ आले. या प्रकारामुळे चंद्रपुरककरांच्या बेजाबदारपणाचे दर्शन झाले.