महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर : अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी - Chandrapur Latest News

शहराला लागून असलेल्या जमनजेट्टी परिसरात शौचालयास गेलेल्या सुनील लेनगुरे राहणार राजीव नगर व जीवन केवट राहणार लालपेठ यांच्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करून, जखमी केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली आहे. गेल्या 15 दिवसांपासून या परिसरात अस्वल आणि बिबट्याचा वावर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी
अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी

By

Published : Mar 6, 2021, 3:20 AM IST

चंद्रपूर -शहराला लागून असलेल्या जमनजेट्टी परिसरात शौचालयास गेलेल्या सुनील लेनगुरे राहणार राजीव नगर व जीवन केवट राहणार लालपेठ यांच्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करून, जखमी केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली आहे. गेल्या 15 दिवसांपासून या परिसरात अस्वल आणि बिबट्याचा वावर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तसेच हे अस्वल सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाले आहे, याची माहिती स्थानिकांनी वनाधिकाऱ्यांना दिली होती. हे अस्वल वेळीच पकडले असते, तर अशी घटना घडली नसती असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी

अस्वलांना पकडण्याची मागणी

दरम्यान वेकोली प्रशासन आणि वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन, जखमींना मदत करावी. तसेच या परिसरात फिरणाऱ्या नर आणि मादी अस्वलांना पकडून नागरिकांची सुरक्षा करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. अस्वलाच्या हल्ल्यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वनविभागाला या परिसरात आढळून आलेल्या अस्वलांची कल्पना दिली होती, त्यांनी वेळीच कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसली असं स्थानिकांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details