चंद्रपूर - ओला दुष्काळ जाहीर करू बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात यावेत, या मागणीसाठी काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर यांनी वरोरा येथील नागपूर-चंद्रपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.
विविध मागण्यांसाठी धानोरकरांचे राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन - नागपूर-चंद्रपूर महामार्ग
ओला दुष्काळ जाहीर करू बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात यावेत, या मागणीसाठी काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर यांनी वरोरा येथील नागपूर-चंद्रपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.
तसेच वर्धा पॉवर प्लांट मध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून जिल्ह्यातील बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करावे, अशी मागणी धानोरकर यांनी केंद्र शासनाला केली होती. परंतु, या मागण्या शासनाने फेटाळून लावल्याने धानोरकर यांनी चक्काजाम आंदोलन पुकारले. या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करून नागपूर मार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. यामुळे काही तासांसाठी महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.