चंद्रपूर Chandrapur Road Accident : ट्रक आणि ऑटोच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना चंद्रपूर बल्लारपूर बायपास मार्गावर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. संगीता चाहांदे (वय : 56, रा. गडचिरोली), अनुषका खेरकर (22, र. बल्लारपूर), ऑटोचालक इरफान खान (वय 49, बाबुपेठ) आणि प्रभाकर लोहे यांचा या अपघातात ( Chandrapur Accident ) मृत्यू झाला आहे.
असा घडला ट्रक आणि ऑटोचा अपघात :ऑटो क्रमांक एमएच 34 एम 8064 ऑटो प्रवासी घेऊन बल्लारपूरकडं जात होता, तर एमएच 34 एम 1817 हा ट्रक चंद्रपूरकडं येत होता. बाबूपेठ बायपास मार्गावरील बिएनआर पुलाजवळ ही दोन्ही वाहनं आमनेसामने आली असताना ऑटोचालक समोरचा खड्डा चुकविण्यासाठी गेला असता अनियंत्रित झालेल्या दोन्ही वाहनांची थेट समोरासमोर धडक झाली. त्यानंतर हा ट्रक ऑटोवर उलटल्याचं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. ही धडक इतकी भीषण होती की चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतकामध्ये संगीता चाहांदे (वय : 56, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (22, र. बल्लारपूर), ऑटोचालक इरफान खान (वय 49, बाबुपेठ) प्रभाकर लोहे यांचा समावेश आहे. तर राजकला मोहूर्ले (वय 34, रा. बाबुपेठ), गीता शेंडे (वय 50, रा. तुकुम), दशरथ बोबडे (वय 50, रा. वणी) यांचा समावेश आहे.