चंद्रपूर -जिल्ह्यात आज 46.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान विदर्भातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत चंद्रपुरात सर्वाधिक होते.
विदर्भ तापला, चंद्रपुरात 46.4 अंश तापमानाची नोंद - Todays temperature of Chandrapur
मागच्या वर्षी चंद्रपूर शहराचे तापमान हे जागतिक पातळीवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. याही वर्षी शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. 23 मे रोजी चंद्रपूरचे तापमान 45.6 अंश सेल्सिअस होते, 24 मे रोजी 46.6 तर 25 मे या दिवशी 46.8 अंश सेल्सिअस तर आज हे तापमान 46.4 इतके नोंदविण्यात आले.
चंद्रपूर शहराचे तापमान उन्हाळ्यात 49 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. जेव्हा नवतपा सुरू असतो, त्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असते. सध्या नवतपा सुरू आहे. म्हणजे नऊ दिवस तापमान उच्चतम पातळीवर जात असते. मागच्या वर्षी चंद्रपूर शहराचे तापमान हे जागतिक पातळीवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. याही वर्षी शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. 23 मे रोजी चंद्रपूरचे तापमान 45.6 अंश सेल्सिअस होते, 24 मे रोजी 46.6 तर 25 मे या दिवशी 46.8 अंश सेल्सिअस तर आज हे तापमान 46.4 इतके नोंदविण्यात आले.
आजचे तापमान हे विदर्भातील सर्वाधिक तापमान आहे. येणाऱ्या काही दिवसांत हे तापमान आणखी वाढणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे लोक कमी प्रमाणात बाहेर पडत आहेत. मात्र, तरीही बाहेर पडताना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.