चंद्रपूर - चंद्रपूर शहरात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. आज ( 21 एप्रिल ) या वर्षीच्या सर्वांधिक तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी 45.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले ( Chandrapur Recorded High Temperature ) आहे. त्यामुळे चंद्रपुरकरांची चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर उष्णतेचे उच्चांक गाठत ( Chandrapur Temperature ) आहे. काल ( 20 एप्रिल ) जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे शहर जगातील सर्वात उष्ण शहर होते. तर, यापाठोपाठ चंद्रपूर हे दुसऱ्या स्थानावर होते. ब्रम्हपुरी शहराचे 20 एप्रिल या दिवशीचे तापमान तब्बल 45.3, तर चंद्रपूरचे 45.2 अंश सेल्सिअस तापमान होते. याही पलीकडे जात चंद्रपूर शहराने उच्चांक गाठला आहे. आज 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ ब्रम्हपुरी शहरात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.