महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंडपिंपरीत चाळीस हजारांची दारू पकडली - चंद्रपूर पोलीस लेटेस्ट न्यूज

दुचाकीवरून गोंडपिंपरी येथील कलीम सय्यद व नागेश बद्दलवार हे येताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली. यावेळेस 180 मिलीच्या 144 दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला.

गोंडपिपरीत चाळीस हजारांची दारू पकडली
गोंडपिपरीत चाळीस हजारांची दारू पकडली

By

Published : May 14, 2020, 6:29 PM IST

चंद्रपूर -गोंडपिपरी गणेशपिंपरी मार्गावरून दारूची वाहतूक करताना दोन आरोपींना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 43 हजार रुपयांची दारू व वाहन जप्त करण्यात आले. गोंडपिपरी पोलिसांनी काल रात्रीच्या सुमारास ही कार्यवाही केली.

लॉकडाऊनच्या काळात गावातील काही दारू तस्कर सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच दरम्यान गणेशपिंपरी मार्गावरून दोघे जण दारूच्या साठ्याची वाहतूक करित असल्याची खबर पोलिसांना मिळाली. यावेळेस पोलिसांनी पाळत ठेवली. यावेळी दुचाकीवरून गोंडपिंपरी येथील कलीम सय्यद व नागेश बद्दलवार हे येताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली. यावेळेस 180 मिलीच्या 144 दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला.

पोलिसांनी 43,200 रुपयांची दारू, 40,000 रुपयांचे वाहन व 1000 रुपये असा एकूण 84,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कलीम सय्यद व नागेश बद्दलवार यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात देवेश कटरे, प्रफुल्ल कांबळे, संतोष काकडे, पुनेश्वर कुळमेथे यांनी ही कार्यवाही केली.

ABOUT THE AUTHOR

...view details