चंद्रपूर -रामनगर पोलिसांनी आज जप्त केलेल्या तब्बल 2 कोटी 17 लाखांच्या दारूसाठ्यावर रोलर फिरवला. यातील बहुतांश साठा देशीदारुचा होता.
चंद्रपुरात देशीदारूच्या दोन कोटीच्या साठ्यावर पोलिसांनी चालवला रोलर - न्यायालय
रामनगर पोलिसांनी जप्त केलेली दारू न्यायालयाच्या आदेशाने नष्ट केली. या दारूची किंमत 2 कोटी 17 लाख एवढी आहे. यातील बहुतांश दारूसाठा देशी दारूचा होता.
चंद्रपुरात देशीदारूच्या दोन कोटीच्या साठ्यावर पोलिसांनी चालवला रोलर
जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात दारू आणली जाते. मागेल त्याला आणि मागेल ती दारू येथे सहज उपलब्ध होते. दारूचा अवैध व्यवसाय आता संपूर्ण जिल्ह्यात पसरला आहे. पोलीस विभागही यावर कारवाई करत असतो. रामनगर पोलिसांनी जप्त केलेली दारू न्यायालयाच्या आदेशाने नष्ट केली. या दारूची किंमत 2 कोटी 17 लाख एवढी आहे. यातील बहुतांश दारूसाठा देशी दारूचा होता.