महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NCP Chandrapur : पदाधिकाऱ्याच्या खंडणी प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे पत्रक - पक्षाच्या नावावर घेतले पैसे

कोणत्याही कार्यकर्ते आणि नेत्याने पक्षाच्या कार्यक्रमाच्या नावावर अथवा वैयक्तिकरित्या पैशाची मागणी केल्यास त्याची तक्रार वरिष्ठांकडे करावी, असे पत्रक राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी काढले आहे.

NCP Chandrapur
NCP Chandrapur

By

Published : Dec 19, 2021, 9:50 PM IST

चंद्रपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चंद्रपूर शहर सचिव नयन साखरे याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली. पक्षाची बदनामी टाळण्यासाठी त्याची हकालपट्टी करण्यात आली. यापुढे कोणत्याही कार्यकर्ते आणि नेत्याने पक्षाच्या कार्यक्रमाच्या नावावर अथवा वैयक्तिकरित्या पैशाची मागणी केल्यास त्याची तक्रार वरिष्ठांकडे करावी, असे पत्रक राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी काढले आहे. यासंदर्भात शासकीय कार्यालयांना रिसतर पत्रही पाठविण्यात आले.

नयन साखरे येथील उपप्रादेशिक कार्यालयात जावून अधिकाऱ्यांना पैशासाठी धमकी द्यायचा. पन्नास हजार रूपये महिना सुरु करण्यासाठी त्यांने आरटीओ अधिकाऱ्यांना त्रस्त करून सोडले होते. त्यांच्या छळाला कंटाळून सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली. दरम्यान त्याला ३५ हजार रूपये महिना देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. तेच पैसे घेण्यासाठी तो काल शुक्रवारला आरटीओ कार्यालयात गेला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पक्षातून हकालपट्टी

या घटनेमुळे पक्षाची पुरती बदनामी झाली. त्यामुळे नयन सारखेची पक्षातून हकालपट्टी करण्याचे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी काढले. या प्रकरणाची झळ आपल्यापर्यंत येवू नये यासाठी कक्कड यांनी आणखी एका पाऊल उचलले. सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पक्षाच्या नावाने किंवा वैयक्तिकरित्या पैसे मागणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांची तक्रार वरिष्ठांकडे करावी, असे अधिकाऱ्यांनी सुचविले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख माजी खासदार मधुकरराव कुकडे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहीते यांचे भ्रमणध्वनी क्रमांक अधिकाऱ्यांनी या पत्रात दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे दौरे वाढले आहे. खासदार सुप्रिया सुळे, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार येऊन गेले. नेत्यांच्या दौऱ्यांच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी पैशाची मागणी शासकीय अधिकारी, कंत्राटदार, दारू विक्रेते यांच्याकडे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते करत आहे, अशी जोरदार चर्चा त्यावेळी होती. साखरेच्या निमित्ताने त्यात बऱ्याच अंशी तथ्य असल्याचे समोर आले.
हेही वाचा -शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सात जणांना अटक, सर्व समाजकंटक रणधीर सेनेशी संबंधित

ABOUT THE AUTHOR

...view details