Live Updates-
- 05.58 PM - बाळू धानोरकर 24 हजार 789 मतांनी आघाडीवर
- 03.21 PM- बाळू धानोरकर 17 हजार 469 मतांनी आघाडीवर
- 02.53 PM- बाळू धानोरकर 12 हजार 37 मतांनी आघाडीवर
- 02.33 PM- बाळू धानोरकर 10 हजार 168 मतांनी आघाडीवर
- 02.17 PM - बाळू धानोरकर 6 हजार 952 मतांनी आघाडीवर
- 01.17 PM - हंसराज अहिर - 96,336 बाळू धानोरकर - 1,03,112 राजेंद्र महाडोळे- 19,985 मते
- 12.14 PM - हंसराज अहिर - 88,274 बाळू धानोरकर - 94,438 राजेंद्र महाडोळे- 17,347 मते
- 12.14 PM - हंसराज अहिर - 80,189, बाळू धानोरकर - 82,910 राजेंद्र महाडोळे- 15,561 मते
- 12.14 PM - हंसराज अहिर - 78,987, बाळू धानोरकर - 80,851 राजेंद्र महाडोळे- 15,203 मते
- 12.01 PM - हंसराज अहिर - 64,301, बाळू धानोरकर - 62,923, राजेंद्र महाडोळे- 10,678 मते
- 12.00 AM - हंसराज अहिर आघाडीवर
- 11.37 AM - बाळू धानोरकर आघाडीवर
- 11.37 AM - हंसराज अहिर - 56027, बाळू धानोरकर - 57018, राजेंद्र महाडोळे- 9873 मते
- 10.22 AM - हंसराज अहिर - 50838, बाळू धानोरकर - 47672, राजेंद्र महाडोळे- 8824 मते
- 10.59 AM - हंसराज अहिर - 47213, बाळू धानोरकर - 44085, राजेंद्र महाडोळे- 8373 मते
- 10.59 AM - बाळू धानोरकर आघाडीवर
- 10.52 AM - हंसराज अहिर - 34666, बाळू धानोरकर - 34256, राजेंद्र महाडोळे- 6202 मते
- 10.33 AM - हंसराज अहिर - 32013, बाळू धानोरकर - 29883, राजेंद्र महाडोळे- 5237 मते
- 10.11 AM - हंसराज अहिर - 25481, बाळू धानोरकर - 22922, राजेंद्र महाडोळे- 4189 मते
- 09.44 AM - हंसराज अहिर - 16225, बाळू धानोरकर - 16176, राजेंद्र महाडोळे- 3454 मते
- 09.28 AM - हंसराज अहिर आघाडीवर
- 08.00 AM - मतमोजणीला सुरुवात
चंद्रपूर- लोकसभा निवडणुकीच्या चंद्रपूर मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही मतमोजणी चंद्रपुरातील महाराष्ट्र स्टेट वेअर कार्पोरेशन गोडाऊन पदोडी या ठिकाणी होत आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून शिवसेनेतून आलेले बाळू धानोरकर तर भाजपकडून सलग तीन वेळा निवडून आलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे मैदानात आहेत. मात्र, वंचितचे उमेदवार राजेंद्र महाडोळेंनी रंगत आणलेल्या या निवडणुकीत मंत्री अहिर विजयाचा चौकार मारणार की, काँग्रेसचे धानोरकर गुलाल उधळणार याचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. यावेळी या मतदारसंघात ६४ टक्के इतके मतदान झाले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडी सांभाळली. तर भाजपच्यावतीने गृहमंत्री राजनाथ सिंह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मैदान गाजवले. तर प्रकाश आंबेडकरांनीही चंद्रपूर येथे महाडोळे यांच्या प्रचारारार्थ सभा घेतली. मात्र, या सभेला खासदार असदुद्दीन आवेसी हे उपस्थित नव्हते.