चंद्रपूर- असंघटिक बांधकाम कामगार कल्याण योजनांचा लाभ मिळण्यासाठी चिमूर तालुक्यात कामगार नोंदणी करण्यात आली. यावेळी नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा साहित्याचे संच देण्यात आले होते. मात्र, आता हे संच वाटप थांबल्याने तसेच कामगार कल्याण अधिकांऱ्याच्या अनास्थेमुळे तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना दररोज संचाकरिता फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे कामगार कल्याण विभागाबद्दल स्थानिक कामगारांत असंतोष आहे.
शासनाच्या श्रमिक कल्याण विभागातर्फे बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियमानुसार विविध आस्थापना, विकासक यांच्याकडून ९ टक्के उपकर वसूल करण्यात येतो.