चंद्रपूर: विदर्भातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूर शहराची नोंद झाली. यावर्षी गेल्या 122 वर्षांचा इतिहास मोडुन काढत चंद्रपुरच्या पाऱ्याने उच्चांक गाठला. सलग मार्च व एप्रिल महिन्यात आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत 48 डिग्री इतका तापमान जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. ही शक्यता आता खरी होताना दिसत आहे.
Hottest City In Vidarbha : चंद्रपूर विदर्भातील सर्वात उष्ण शहर; 46.8 डिग्री तापमानाची नोंद - In Vidarbha
चंद्रपूर शहरात (City of Chandrapur) आज 46.8 डिग्री तापमानाची नोंद (Record temperature of 46.8 degrees) झाली. पुर्ण विदर्भात (In Vidarbha) आज चंद्रपूर सर्वात उष्ण शहर (Chandrapur is the hottest city in Vidarbha) राहिले.
![Hottest City In Vidarbha : चंद्रपूर विदर्भातील सर्वात उष्ण शहर; 46.8 डिग्री तापमानाची नोंद temperature](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15294297-246-15294297-1652627184419.jpg)
मे महिन्यात दिवसेंदिवस चंद्रपूर शहराचे तापमान उच्चांक गाठत आहे. आज तब्बल 46.8 डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली. विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूर नोंदवल्या गेले. दुसऱ्या क्रमांकावर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराचा समावेश आहे. तेथे 45.9 डिग्री इतके तापमान आज नोंदविण्यात आले. याचप्रमाणे अकोला 44.5, अमरावती 45, बुलढाणा 41.3, गोंदिया 45.5, नागपूर 45.1, वर्धा 45.6, यवतमाळ 44.5 डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत या तापमानात आणखी वाढ होईल अशी चिंता व्यक्त केली जात आहे.