चंद्रपूर :जन्मदात्या वडिलाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना आधी विष Children were poisoned पाजले. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. २) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वरोरा शहरालगतच्या बोर्डा गावात Children of Borda village were poisoned घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, फरार वडिलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. संजय श्रीराम कांबळे (वय ४०) असे वडिलाचे, तर सुमित (वय ७), मिस्टी (वय ३) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.
तालुक्यातील बोर्ड येथे संजय कांबळे Sanjay Kamble poisoned children हे कुटुंबीयांसह राहतात. खासगी शिकवणी हा त्यांचा व्यवसाय होता. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी पनिता (वय ३५) ही एका महाविद्यालयात कंत्राटी स्वरुपात नोकरीवर जात होती. त्यांच्या संसारवेलीवर सुमित (वय ७), मिस्टी (वय ३) अशी दोन फुले उमलली होती. सुखात संसार सुरू होता. परंतु, मागील काही दिवसांपासून संजय कांबळे यांची मानसिकस्थिती बिघडली होती. यामुळे शिकवणी वर्ग बंद होण्याच्या मार्गावर होते.