चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सैन्याला पाचारण करण्यात आले. राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल याची मदत उपलब्ध नसल्याने सैन्याला पाचारण करण्यात आले. भद्रावती तालुक्यातील माणगाव ( Mangaon in Bhadravati Taluka ) येथील 113 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात ( 113 people Shifted to Safe Place ) आले आहे. मात्र, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसार माध्यमांसमोर येऊ दिली नाही. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरवाडे ( Disaster Management Officer Surwade ) यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या बचाव कार्यबाबत दुजोरा दिला. 20 जुलैच्या दुपारपर्यंत हे कार्य सुरू होते.
विदर्भातील पूरसदृश परिस्थितीवर लष्कराचे मदतकार्य :राज्य सरकारच्या विनंतीनुसार, पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि बचावासाठी मदत करण्यासाठी विदर्भात सैन्य तैनात करण्यात आले होते. 19 जुलै 2022 रोजी रात्री 10.30 वाजता मेजर भुवन शाह यांच्या नेतृत्वाखाली गार्ड्स रेजिमेंटल सेंटर (GRC) कॅम्पटी येथील सैन्य दल आवश्यक उपकरणांसह प्रभावित भागात पोहोचले. त्यांनी बचावकार्य तातडीने सुरू करीत, गावातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्याद्वारे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यात आले.