महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात बाधितांची संख्या 1 हजार 165; तर 784 जणांना उपचारानंतर 'डिस्चार्ज'

खासगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांनी देखील लक्षणे आढळणाऱ्या सामान्य बाधितांना लगेच चाचणी करण्याचा सल्ला द्यावा, असे आवाहन केले आहे. चंद्रपूर शहरांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात जटपुरा वार्ड, येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ चाचणी सुरू आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 19, 2020, 5:18 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 1 हजार 165 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 370 आहे. तर उपचारानंतर बरे झाल्याने 784 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल(मंगळवार) आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रत्येक गावांमध्ये चाचण्यांची संख्या वाढविण्यचे आदेश त्यांनी दिले. ऑक्सीमीटर तपासणी वाढविण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात परस्पर संपर्कातून रुग्ण वाढत असल्याने लक्षणे दिसाणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट व्हावी यासाठी, अतिरिक्त 30 हजार टेस्टिंग किट मागविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांनी देखील लक्षणे आढळणाऱ्या सामान्य बाधितांना लगेच चाचणी करण्याचा सल्ला द्यावा, असे आवाहन केले आहे. चंद्रपूर शहरांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात जटपुरा वार्ड, येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ चाचणी सुरू आहे. तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात चाचणी सुरू आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत चाचणी उपलब्ध आहे. नागरिकांनी आता स्वतःहून पुढे येत लक्षणे दिसल्यास सातत्याने ताप, सर्दी, खोकला असल्यास आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक बाधित हे राजुरा येथील आहे. राजुरा शहरातील आंबेडकर वार्ड, अमराई वार्ड, तसेच तालुक्यातील टेंभुरवाही गावामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले असून या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याच्या अवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राजुरा शहर व तालुका मिळून एकूण 14 रुग्ण समोर आले आहेत.

त्यापाठोपाठ बल्लारपूर शहरातून 9 बाधित पुढे आले आहे. यामध्ये गणपती वार्ड, बालाजी वार्ड, रवींद्र नगर, या भागातील नागरिकांचा समावेश आहे. या परिसरातील नागरिकांनी देखील संपर्कातून बाधितांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. गरज नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर महानगरात देखील 7 बाधित आढळून आले आहे. तालुक्यातील वरवट तळोधी पोलीस लाईन, सावरकर नगर, दूध डेअरी या परिसरात रुग्ण पुढे आले आहेत . याशिवाय वरोरा (2) जीवती (5)घुगुस (1) चिमुर(3)मुल(1) सावली (1) या भागातून बाधित पुढे आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details