चंद्रपूरचंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या कार्यालयात शुक्रवारी 19 ऑगस्टला लातूरच्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. लक्ष्मण पवार असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, लक्ष्मण पवार यांनी घडलेल्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आश्रमशाळेला अनुदान मिळवून देण्याचं अमिश दाखवून मनपा आयुक्त मोहिते यांनी आपल्याकडून 15 लाख रुपये घेतले. त्यावेळी ते तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहायक होते. मात्र, वारंवार तगादा लावूनही मोहिते यांनी पैसे परत केले नाही. Chandrapur Municipal Corporation त्यामुळे मला आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागला असा धक्कादायक आरोप लक्ष्मण पवार यांनी Chandrapur Crime ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी राहणारे लक्ष्मण पवार यांनी शुक्रवारी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या कार्यालयात जाऊन स्वतःवर चाकूचा हल्ला करत आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच सुरक्षारक्षक धावून आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. यात जखमी झालेले लक्ष्मण पवार यांच्यावर चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. तसेच शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवी कलम 309 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Chandrapur Municipal Corporation तसेच त्यांच्याजवळ 2 पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले गेले आहे. त्यामुळे पवार यांना कुणालाही भेटण्यास, बोलण्यास मनाई आहे. त्यांना सुट्टी होताच लगेच त्यांना पोलीस अटक करणार आहेत. मात्र या दरम्यान ईटीव्ही भारतने त्यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
आश्रमशाळेच्या अनुदानाच्या नावाने घेतले 15 लाख2016 मध्ये राजेश मोहिते हे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहाय्यक होते. यावेळी एका व्यक्तीच्या ओळखीने लक्ष्मण पवार आणि त्यांच्या वडिलांनी मोहिते यांची भेट घेतली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेला अनुदान देण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार यासाठी 14 लाख 70 हजारांची रक्कम देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार पवार यांनी आश्रमशाळेच्या बांधकामासाठी 10 लाख खर्च केले. यादरम्यान पवार आणि त्यांच्या वडिलांनी मोहिते यांना आधी 10 लाख 70 हजार आणि नंतर 4 लाख रुपये अशी 2 टप्प्यात रक्कम दिली, असे पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.
दबावापुढे 3 लाखांचा पर्यायरक्कम मिळाल्यावर मोहिते यांनी आठ ते दहा दिवसांत आश्रमशाळेला मान्यता मिळेल असे सांगितले. मात्र यानंतर आज या उद्या या, आता अधिवेशन सुरू आहे, अशी टाळाटाळ सुरू झाली. यानंतर मोहिते यांची नागपूर मनपा उपायुक्तपदी बदली झाली. त्यामुळे आता आपले काम होणार नाही, याची शाश्वती पवार यांना झाली. त्यानुसार त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. यावेळी मोहिते 70 हजार परत देण्यात आले. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी पवार सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांनी चंद्रपूर मनपासमोर आमरण उपोषण करण्याचा प्रयत्नही केला. मंत्रालयासमोर आत्मदहनाचा देखील इशारा दिला होता. मात्र प्रशासकीय दबावापुढे त्यांचे काही जमले नाही. यानंतर पवार यांनी लातूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तिथल्या पोलिसांनी तक्रार घेऊन पवार यांच्यावर ही तक्रार मागे घेण्यास दबाव आणला. यादरम्यान मोहिते आणि पवार यांच्यात 2 मे 2022 ला कागदोपत्री करार झाला. या तडजोडपत्रावर आता यापुढे आपण राजेश मोहिते यांना कुठलाही मानसिक त्रास देणार नाही आणि आपली तक्रार आपण मागे घेत असल्याचे हमीपत्र द्यावे लागले. यादरम्यान मोहिते यांनी 3 लाख परत केले असल्याचे पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.