महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१८ वर; गुरुवारी ५ रुग्ण वाढले - चंद्रपूर कोरोना न्यूज

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या २१८ वर पोहोचली आहे. १२० जण कोरोनामुक्त झाले असून ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Chandrapur corona update
चंद्रपूर कोरोना अपडेट

By

Published : Jul 17, 2020, 6:43 AM IST

चंद्रपूर- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २१८ झाली आहे. यापैकी १२० जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सध्या ९८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १७ जण जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे ११ जवान व ६ जण अन्य राज्याचे रहिवासी आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ५ बाधितांची भर पडल्यामुळे रुग्णांची एकूण संख्या २१८ झाली आहे. जिल्ह्यातील तालुक्याच्या व ग्रामीण भागातील रुग्णांचा या ५ जणांमध्ये समावेश आहे. यामध्ये नागभीड तालुक्यातील तेलीमेंढा या गावातील ४९ वर्षीय केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथे कार्यरत असलेला हा जवान चंद्रपूरला १२ जुलै रोजी आल्यानंतर होम क्वारंटाइन होता.

चंद्रपूर कोरोना अपडेट

ब्रह्मपुरी शहरातील विद्यानगर परिसरात राहणारी २५ वर्षीय युवती गोरेगाव मुंबई येथून परत आली आहे. ती आल्यापासूनच संस्थात्मक क्वारंटाइन होती. गोंडपिंपरी येथील ३३ वर्षीय कामगार बिहार येथून रेल्वेने परत आल्यापासून संस्थात्मक क्वारंटाइन होता. हैदराबाद येथे एका बिस्कीट कंपनीत काम करणाऱ्या २६ वर्षीय युवकाचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. हैदराबाद येथून ३० जूनला आल्यानंतर त्याची दोन वेळा चाचणी केली असता, दुसरी चाचणी पॉझिटिव्ह ठरली. माणिकगड सिमेंटमध्ये काम करणाऱ्या एका अभियंत्याचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. नोएडा येथून रेल्वेने १४ जुलै रोजी माणिकगड येथे आल्यानंतर संस्थात्मक क्वारंटाईन असलेला हा युवक पॉझिटिव्ह ठरला आहे.

दरम्यान, गुरुवार पर्यंत जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २१८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ९८ संक्रमित असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये ७५, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात २३, असे मिळून एकूण ९८ जणांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details