चंद्रपूर : काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे दिल्लीत निधन झाले. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर वरोऱ्यात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान खासदार बाळू धानोरकर यांच्या वडिलांचेही चार दिवसापूर्वी निधन झाले आहे. चार दिवसाच्या फरकाने पिता पुत्राचा मृत्यू झाल्याने चंद्रपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसापूर्वी केले दिल्लीतील रुग्णालयात दाखल :काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर मेदांता रुग्णालयातच उपचार सुरू होते. मात्र आतड्यांचा संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती आणखी खाल्यावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.
शनिवारी किडनी स्टोनची झाली शस्त्रक्रिया :बाळू धानोरकर यांच्यावर शनिवारी किडनी स्टोनची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या आतड्यात संसर्ग झाल्याने त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. खासदार बाळू धानोरकर यांना एअर अॅम्बुलन्सने नागपुरातून दिल्लीला हलवण्यात आले होते.
वडिलांचाही चार दिवसापूर्वी मृत्यू :खासदार बाळू धानोरकर यांच्या वडिलांचाही चार दिवसापूर्वी मृत्यू झाला आहे. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर बाळू धानोकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अंत्यविधीसाठी येता आले नाही. त्यातच आता चार दिवसानंतर बाळू धानोरकर यांचीही प्राणज्योत मालवली आहे. त्यामुळे चार दिवसात पिता पुत्राचे निधन झाल्याने चंद्रपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात झाला होता जन्म :बाळू धानोरकर यांचा जन्म
4 जून 1975 ला यवतमाळमध्ये झाला होता. 2014 मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून भद्रावती वरोरा विधानसभेतून निवडून आले होते, त्या नंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस कडून चंद्रपुर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्रातून काँग्रेस चे एकमेव खासदार म्हणून ते निवडून आले होते,