चंद्रपूर - काल चंद्रपूरचा पारा चांगलाच वर चढला. विदर्भातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची ( Chandrapur city temperature ) नोंद झाली आहे. काल 44 डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर शहर हे विदर्भातील ( Vidarbha city temperature ) सर्वात उष्ण शहरांपैकी एक आहे. यावर्षी कधी नव्हे ते मार्च महिन्यात उन्हाचा कोप जाणवू लागला.
हेही वाचा -चंद्रपूर वीज केंद्रात 8 दिवस पुरेल इतकाच कोळसा, विजेचे संकट देशभरात - उर्जाराज्यमंत्री तनपुरे
मार्च महिन्याच्या शेवटी 43 डिग्रीपर्यंत तापमान गेले. या महिन्याच्या 50 वर्षांच्या इतिहासात आजवर कधीही इतक्या उष्णतेची नोंद झाली नाही. 1 एप्रिल रोजी जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूर शहराची नोंद झाली. 43.2 डिग्री इतक्या तापमानाची नोंद यावेळी करण्यात आली होती. मात्र, यानंतर चंद्रपूर उष्णतेच्या बाबतीत थोडे थंडावले. अकोला आणि बुलडाणा हे सातत्याने उष्णतेचे उच्चांक गाठत होते. मात्र, काल विदर्भातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूर शहराची नोंद झाली. 44 डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली. तर, अकोला 43.7, अमरावती 42.2, बुलडाणा 39.5, ब्रम्हपुरी 43.2, गडचिरोली 40.6, गोंदिया 42, नागपूर 42.8, वर्धा 43 डिग्री इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा -Leopard caged in Chandrapur : दहशत निर्माण करणारा दुर्गापुरातील बिबटया जेरबंद; नागरिकांना दिलासा