नागपूर -विदर्भाच्या काळ्या मातीखाली सोनं दडलंय ही माहिती भूगर्भ सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे. यापूर्वी चंद्रपूर, भंडारा या दोन जिल्ह्यात सोन्याचे साठे ( Chandrapur Districts Underground Gold Reserves ) असल्याचं सर्वेक्षणात पुढं आलं होतं. आता राज्याच्या उपराजधानीतही सोन्याचे साठे (Underground gold deposits in Nagpur ) असल्याचं पुढं आलंय.
नागपूर जिल्ह्यातील भूगर्भात सोन्याचा साठा परसोडी, किटाळा, मरुपार भागात सोन्याचे साठे - नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरुपार या गावांच्या खाली सोन्याचे साठे ( Department of Geological Survey ) आहेत. मात्र, त्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे. याशिवाय इतर मौल्यवान धातुसाठा असल्याचं सर्वेक्षणातुन पुढं आलंय.
सोन्याचे प्रमाण अत्यल्प -नागपूर जिल्ह्यात सोन्याचे साठे आढळले असले तर ते कमी प्रमाणात असल्याने अद्याप खाणींसाठी लिलाव झाला नाही. मागील आठवड्यात राज्यातील दोन जिल्ह्यात सोन्याचा खाणी सापडल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातही काही प्रमाणात साेन्याचे साठे असल्याचा अंदाज भूगर्भ सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला आहे. नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम ब्लाॅकमध्ये परसाेडीच्या परिसरात साेन्याचे मुबलक साठे असल्याचे जीएसआयने नमूद केले आहे. त्यामुळं हा सोनेरी साठा महाराष्ट्राला झळाळी आणणार की तसाच जमिनीखाली राहणार, ही येणारी वेळ सांगेल.
राज्य सरकारकडून निर्णयाची प्रतीक्षा -नागपूर जिल्ह्यातील भूगर्भात मौल्यवान धातूचे साठे आढळून आले आहेत. ज्या भागात साठे आढळून आले आहेत,त्या भागात खोदकाम करण्याचा सल्ला भूगर्भ सर्वेक्षण विभागाने राज्य सरकारला दिला आहे. मात्र, राज्य सरकारकडे अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही
विदर्भात अनेक धातूंचा साठा -राज्यातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांतील भूगर्भात सोन्याचा साठा उपलब्ध आहे. या वृत्ताला माहितीला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला आहे. याशिवाय कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनंही असू शकतं, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.