महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईव्हीएमच्या घोळाबाबत प्रशासनाची लपवाछपवी, वंचितचे उमेदवार राजू झोडे यांचा आरोप - दुर्गापूर इव्हीएम घोटाळा

बल्लारपूर विधानसभा मतदान क्षेत्रात येणाऱ्या दुर्गापूर येथे एका वाहनात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन आढळल्या होत्या. कुठलेही नियम न पाळता या मशीनची वाहतूक केली जात होती. त्यातही, या माशिन एका जिल्हा परिषद सदस्याच्या घराजवळ आढळल्या होत्या. याबाबत प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न होतो आहे, असा थेट आरोप बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांनी केला आहे.

Raju Zode demands complete inquiry about EVM

By

Published : Oct 23, 2019, 5:27 AM IST

चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदान क्षेत्रात येणाऱ्या दुर्गापूर येथे एमएच 18 एस 1709 या वाहनात इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन संशयास्पदरित्या आढळून आल्या होत्या. वाहनात एक पोलीस कर्मचारी आणि वाहनचालक होता. पकडले गेले असता, या दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात विचारपूस केली असता, प्रशासनाकडून संभ्रम निर्माण करणारी उत्तरे देण्यात आली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांनी केला आहे.

ईव्हीएमच्या घोळाबाबत प्रशासनाची लपवाछपवी, वंचितचे उमेदवार राजू झोडे यांचा आरोप

प्रशासनाकडून हे ईव्हीएम राखीव असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोणतेही ईव्हीएम वाहनातून नेताना, त्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. ज्या वाहनातून मशीन नेण्यात येते तिथे एक पोलीस कर्मचारी, झोनल अधिकारी असणे गरजेचे असते. तसेच त्या वाहनात जीपीएस तंत्रज्ञान असणे आवश्यक असते. मात्र, याप्रकरणी या अटींची पूर्तता झाल्याचे दिसून आले नाही.

याबाबत प्रशासनाकडून देखील संभ्रम निर्माण करणारे स्पष्टीकरण देण्यात आले. आधी ते राखीव ईव्हीएम मशीन असल्याचे सांगण्यात आले. तर, नंतर ते डेमो देणारे ईव्हीएम मशीन असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे, या मतदारसंघात निवडणूक पारदर्शीपणे होत आहे का, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा प्रश्न झोडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.

हेही वाचा : दुर्गापुरात 'ईव्हीएम' सापडल्याने गदारोळ, उमेदवारांनी घेतला आक्षेप

या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती आपल्याला देण्याची मागणी झोडे यांनी केली आहे. मतदान केंद्राच्या अनुक्रमांकानुसार परिशिष्ट 57, मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी, त्यांचे प्रतिज्ञापत्र, ईव्हीएमबद्दलचा रिपोर्ट अशी सर्व माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला मागितली आहे.

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या दबावाखाली आहे प्रशासन..
दुर्गापूर परिसरात वंचितला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातूनच अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दबावाखाली प्रशासन काम करीत आहे, असा आरोप देखील झोडे यांनी केला.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तत्काळ हटवा..
कुठल्याही नियमांचे पालन न करता एखाद्या वाहनात ईव्हीएमची वाहतूक केली जाते. याचे कुठलेही समाधानकारक स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला आहे त्यामुळेच निवडणुकीच्या पारदर्शीपणा व प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांना तात्काळ हटवून त्यांच्या जागी दुसरा निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात यावा अशी मागणीही राजू झोडे यांनी केली आहे.

हेही वाचा : मतदानाची धावपळ; निवडणूक कर्मचाऱ्यांना नेणारी बस अडकली चिखलात

ABOUT THE AUTHOR

...view details