महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrapur Accident Case बोलेरोची ट्रकला धडक चार ठार तर एक गंभीर गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात - Chandrapur Accident Case

गडचिरोली येथील प्रसिद्ध डीजेवादक पंकज बागडे हे सावली तालुक्यातील विहीरगाव येथील अनुप ताडूलवार या आपल्या मित्रासोबत चंद्रपूर येथे डिजेचे काही साहित्य खरेदीसाठी बोलेरोने आले होते. साहित्य खरेदी करून परत गावाकडे येत असतानाच सावली तालुक्यातील किसानगर येथे मुख्यमार्गावर गाय बसलेली होती तिला वाचविण्यासाठी कट मारत असताना स्टेरिंग रॉड तुटला आणि गाडी ही त्या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार धडकली. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला.

Chandrapur Accident Case
चंद्रपुरात अपघात

By

Published : Aug 13, 2022, 2:12 PM IST

चंद्रपूर रस्त्यावर आलेल्या गायीला वाचविण्यासाठी गाडीचे स्टेअरिंग फिरवत असताना बोलेरो ट्रकला Bolero Collided with a Truck धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, चार जणांचा यात जागीच मृत्यू तर एक गंभीर Four Killed And One Seriously जखमी झाला आहे. या अपघातात बोलेरो गाडीचा चेंदामेंदा Bolero Car was Literally Destroyed झाला. ही घटना काल रात्री चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली येथे मध्यरात्री घडली.


गाडीचे स्टेअरिंग तुटल्याने झाला अपघात गडचिरोली येथील प्रसिद्ध डीजेवादक पंकज बागडे Pankaj Bagde, a famous DJ from Gadchiroli हे सावली तालुक्यातील विहीरगाव येथील अनुप ताडूलवार या आपल्या मित्रासोबत चंद्रपूर येथे डिजेचे काही साहित्य खरेदीसाठी बोलेरो गाडी क्रमांक MH 33A 5157 ने आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत अनुपची पत्नी व साळा ही सोबत होता. साहित्य खरेदी करून परत गावाकडे येत असतानाच सावली तालुक्यातील किसानगर येथे मुख्यमार्गावर गाय बसलेली होती तिला वाचविण्यासाठी कट मारत असताना स्टेरिंग रॉड तुटला आणि गाडी ही त्या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार धडकली.

अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू तर एक जखमी अपघात झाल्यानंतर जोरदार आवाज झाला. त्यानंतर किसानगर व व्याहड खुर्द येथील काही सावली पोलिसांना माहिती दिली. सावली चे ठाणेदार आशिष बोरकर हे घटनास्थळी दाखल होत तेथील स्थानिकांची मदत घेत त्या अपघातग्रस्तांना बाहेर काढले. तेथील मृतकांना व जखमीला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. या अपघातात पंकज किशोर बागडे वय 26 रा. गडचिरोली अनुप रमेश ताडूलवार वय 35 वर्ष रा. विहीरगाव ता. सावली, महेश्ववरी अनुप ताडूलवार वय 24 वर्ष रा. विहीरगाव, मनोज अजय तीर्थगिरीवार वय 29 रा. ताडगाव ता. भामरागड जिल्हा गडचिरोली यांचा मृत्यू झाला, तर सुरेंद्र हरेंद्र मसराम वय 23 वर्ष रा. चिखली ता. सावली जिल्हा चंद्रपूर हे जखमी झालेले आहे. अपघाताचा तपास सावली पोलीस करीत आहे.

हेही वाचा Saamna Criticize on Shinde Government बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार सामनातून सरकारवर टीकास्त्र

ABOUT THE AUTHOR

...view details