चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा येथे विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिम्मीत्त संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी जनता विद्यालय येथील विध्यार्थी तथा गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
चंद्रपुरात उद्देशिका वाचून संविधान दिन साजरा - Celebrate Constitution Day news chandrapur
गोंडपिपरी तालुक्यातील संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालया तर्फे रॅली काढण्यात आली.
हेही वाचा-'महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
गोंडपिपरी तालुक्यातील संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालया तर्फे रॅली काढण्यात आली. बसस्थानक परिसरात असलेल्या संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. संविधान निर्मितीच्या प्रवासावर मुख्यधापक एस.एन.पेंढारकर यांनी मार्गदर्शन केले.