चंद्रपूर- गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथील एक शेतकऱ्या आपल्या गुरांना शेतातून गावाकडे नेत असताना नाल्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामुळे गुरे वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि. 29 ऑगस्ट) घडली.
थरारक..! पूरात वाहून गेला गुरांचा कळप; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथील एक शेतकऱ्या आपल्या गुरांना शेतातून गावाकडे नेत असताना नाल्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामुळे गुरे वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि. 29 ऑगस्ट) घडली.
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचेही दिसून येत आहे. धाबा गावातील काही घरात पाणीही शिरले आहे. या गावापासून एक किलोमीटर अंतरावर एक मोठा नाला आहे. जो पावसामुळे ओसंडून वाहत होता. गावातील गुरांचा कळप हा नाला पार करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की मागील काही गुरे हे नाला पार करीत असताना प्रवाहात फेकली गेली. ही गुरे पुन्हा पुलावर येण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, त्यात ते अपयशी ठरले. यातील दोन गुरे ही वाहून गेल्याची माहिती आहे.