महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLA Bunty Bhangdia : भाजप आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल; काँग्रेस कार्यकर्त्यासोबत झाला वाद

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्यावर मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कॉंग्रेस सरचिटणीसांच्या भावासोबत झालेल्या वादातून हे प्रकरण समोर आले आहे. तसेच काही भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

MLA Bunty Bhangdia
बंटी भांगडिया

By

Published : Mar 12, 2023, 7:26 PM IST

Updated : Mar 12, 2023, 8:06 PM IST

चंद्रपूर : काँग्रेस कार्यकर्त्यासोबत झालेल्या वादाने टोक गाठले आणि यात विनयभंग केल्याचा गुन्हा चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. चंद्रपुरातील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण? : संबंधित पीडित महिलेनं तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला आणि त्यांचे पती साईनाथ बुटके हे चिमूर येथे राहतात. साईनाथ बुटके यांचे मोठे भाऊ गजानन बुटके हे काँग्रेसचे चंद्रपूर जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत. 11 मार्चला भाजपचे आमदार बंटी भांगडिया हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह बुटके यांच्या घराच्या बाहेर आले. त्या कार्यकर्त्ये बुटके यांना शिवीगाळ करत त्यांच्या घरात जबरदस्तीने शिरले आणि साईनाथ यांना मारहाण करत बाहेर घेऊन आले.

विनयभंगाचा गुन्हा दाखल : या मारहाणीला विरोध केला असता, त्यांनी विनयभंग केला आणि मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. बंटी भांगडिया यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिला तसेच साईनाथ आणि त्यांच्या दोन्ही लहान मुलांना मारहाण केली. गजानन बुटके हे त्याचवेळी घरी पोहोचले अन् त्यांनीही भांगडिया यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण गजानन बुटकेंना देखील मारहाण करण्यात आली, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेने केलेल्या तक्रारीनंतर भांगडिया यांच्यासह त्यांच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांविरुद्ध कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कुणालाही अटक नाही :आमदार बंटी भांगडिया भाजपा पक्षाचे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे आमदार आहेत. या विनयभंग प्रकरणातील साईनाथ बुटके यांचा कुठल्याही पक्षासोबत संबंध नाही. मात्र, त्यांचे भाऊ गजानन बुटके हे काँग्रेसचे पदाधिकारी असून माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत. तसेच ते माजी कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, अजूनपर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

हेही वाचा : Mumbai Crime : मुंबईत परदेशी महिलेवर बलात्कार; अश्लील फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करायचा, गुन्हा दाखल

Last Updated : Mar 12, 2023, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details