महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tobacco Control Campaign : तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याच्या मोहीमेत 34 टपरीवाल्यांवर कारवाई - चंद्रपूर अपडेट

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (National Tobacco Control Program) भरारी पथकामार्फत शहरातील 34 पान टपरीवाल्यावंर कारवाई करण्यात आली. यात जटपुरा गेट, रामनगर, वरोरा नाका, जनता महाविद्यालय परिसर येथील 22 पानटपरीधारकांना प्रत्येकी 200 रुपये तर उर्वरीत 12 पानटपरीधारकांना प्रत्येकी 400 रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला.

Campaign for Tobacco Control Act
34 पान टपरीवाल्यांवर कारवाई

By

Published : Jan 15, 2022, 7:37 AM IST

चंद्रपूर:सार्वजनिक ठिकाणी, महाविद्यालय, हॉस्पिटल, शाळा परिसरात असलेल्या पानठेल्यावर आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलिस विभाग यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली. जास्तीत जास्त लोकांना तंबाखूच्या दुष्परिणामाची जाणीव होऊन नवीन पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे. भरारी पथकामध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, अन्न निरीक्षक सातकर, पोलिस निरीक्षक मूळे, पोलीस उपनिरीक्षक दराडे, रामनगर पोलिस स्टेशन व त्यांची चमू तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येणारे समुपदेशक मित्रंजय निरंजने, तुषार रायपुरे, अतुल शेंद्ररे, यांनी ही कामगिरी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details