महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतातील मोटर पंपाचे केबल चोरट्यांनी केले लंपास;19 शेतकऱ्यांची पोलिसांमध्ये धाव - chandrapur cable thief news

शेताला सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी पात्रात बसविलेले मोटर पंपाला लावलेले केबल चोरण्याची घटना चंद्रपुरातील गोंडपिपरी तालूक्यातील तारसा बुजरुक येथे उघडकीस आली आहे. याविरोधात तब्बल 19 शेतकऱ्यांनी चोरीची तक्रार नोंदविली आहे.

cable-of-motor-pumps-looted-by-thieves
चंद्रपुरातील तारसा बुजरुक येथे शेतातील मोटर पंपाचे केबल चोरट्यांनी लंपास केले आहे.

By

Published : Dec 5, 2019, 6:24 PM IST

चंद्रपूर - शेताला सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी पात्रात बसविलेले मोटर पंपाला लावलेले केबल चोरण्याची घटना गोंडपिपरी तालूक्यातील तारसा बुजरुक येथे उघडकीस आली आहे. याविरोधात तब्बल 19 शेतकऱ्यांनी चोरीची तक्रार नोंदविली आहे.

चंद्रपूरातील तारसा बुजरुक येथे शेतातील मोटर पंपाचे केबल चोरट्यांनी लंपास केले आहे.

हेही वाचा - वृद्ध दाम्पत्याचे एक लाख रुपये चोरणाऱ्या ओडिशातील दोघांना अटक

गोंडपिपरी तालूक्यात तारसा बुजरुक हे वैनगंगा नदी काठावर वसलेले गाव आहे. येथील शेती ही नदीच्या काठावर असल्याने शेतात सिंचन करण्यासाठी बहूतांश शेतकऱ्यांनी नदी पात्रात मोटर पंप बसलिले आहे. या मोटार पंपाना विद्यूत खांबावरील केबलद्वारे वीज पूरवठा करण्यात येतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासुन हे केबल लंपास करण्याचा सपाटा चोरट्यांनी चालविला आहे. अवघ्या पंधरा दिवसात अनेक शेतकऱ्यांचे केबल चोरट्यांनी चोरले आहेत. या प्रकरणी 19 शेतकऱ्यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये केबल चोरीची तक्रार नोंदविली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details