चंद्रपूर - लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकून पडलेल्या मजुरांची पायपीट अद्याप सुरुच आहे. तेलंगाणात अडकलेले मजूर पोडसा सीमेवरुन चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत पाय ठेवत आहेत. आत्तापर्यंत हजारो मजुरांनी पोडसा सीमामार्गे स्वगाव गाठले असून अद्याप मजुरांचे येणे सुरुच आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या मजुरांसाठी शासनामार्फत बसची सुविधा करण्यात आली असून सध्या या मार्गावरुन लालपरीची धाव सुरू झाली आहे.
महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरुन येणाऱ्या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी 'लालपरी' सज्ज - bus started from podsa border in chandrapur
चंद्रपूर जिल्ह्याच्या पोडसा सीमेवरुन गेल्या तीन दिवसात हजारोंच्या संख्येने मजुरांनी प्रवेश केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. या मजुरांना खाजगी वाहनाने गावोगावी पोहचविण्यात आले. मात्र, अजूनही थोड्याफार प्रमाणात मजुरांचे पोडसा सीमेमार्गे येणे सुरू आहे. त्यामुळे, या मजुरांची गैरसोय टाळण्यासाठी आता सीमेवर एसटी बसेसची सुरुवात करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर मोठ्या संख्येने तेलंगाणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्याने हजारो मजूर तेलंगणात अडकून पडले होते. तब्बल दीड महिन्यांनी या मजुरांनी पोडसा सीमा गाठून राज्यात प्रवेश केला. या सीमेवरुन गेले तीन दिवस मोठ्या संख्येने मजुरांचा ओघ सुरू होता. तर, एकाच वेळी हजारो मजुर धडकल्याने प्रशासनाचीही तारांबळ उडाली होती.
पोडसा सीमेवर आलेल्या मजुरांना खाजगी वाहनाने गावोगावी पोहचविण्यात आले. मात्र, अजूनही थोड्याफार प्रमाणात मजुरांचे पोडसा सीमेमार्गे येणे सुरू आहे. त्यामुळे, या मजुरांची गैरसोय टाळण्यासाठी आता सीमेवर एसटी बसेसची सुरुवात करण्यात आली असून मागील दोन दिवसांपासून या मार्गावरुन बसेस धावत आहेत.