चंद्रपूर -मतदान केंद्रावरील निवडणुकीची आवश्यक साहित्य सामग्री आणि कर्मचाऱ्यांना नेण्याकरिता आलेली महामंडळाची आरामदायक बस गोंडपिपरी तालुक्यातील तारशा गावात चिखलात अडकल्याची घटना घडली. बस काढण्यासाठी गावकरी धावून आले परंतू चिखलात रुतलेली बस काही निघाली नाही. अखेर दोन तासांनी दूसरी बस बोलावण्यात आली, त्यानंतर त्या साहित्यासह निवडणूक कर्मचारी मार्गस्थ झाले.
मतदानाची धावपळ; निवडणूक कर्मचाऱ्यांना नेणारी बस अडकली चिखलात - Chandrapur AssemblyElection2019
चंद्रपूर जिल्ह्यातील तारशा गावातील मतदान केंद्रावरील निवडणुकीसाठी आणलेले साहित्य आणि कर्मचाऱ्यांना नेणारी बस चिखलात अडकली होती. अखेर दुसरी बस बोलवण्यात आल्यानंतर दोन तास उशिरा कर्मचाऱ्यांनी गाव सोडले.
मतदान साहीत्य नेणारी बस चिखलात फसली
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यात सोमवारी दमदार पाऊस झाला. पावसाचा फटका मतदानावर झाला. मतदाना टक्का घसरला. दूसरीकडे पावसामुळे रस्ते चिखलमय झाले. तारशा गावात निवडणूक साहित्य आणि कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी आलेली बस चिखलात अडकली. चिखलात रुतलेली बस काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, बस निघाली नाही. अखेर दोन तासांनी दूसरी बस बोलविण्यात आली अन निवडणूक साहित्य, कर्मचाऱ्यांना त्या बस मध्ये पाठवण्यात आले.
Last Updated : Oct 22, 2019, 11:17 PM IST