महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रानडुकराची कारला धडक; एक ठार, पाच जखमी - bull hit car one died

राजूरा तालुक्यातील चनाखा गावाजवळ हा अपघात झाला.

bull hit car one died five injured in chandrapur
चंद्रपूरमध्ये रानडुकराची कारला धडक

By

Published : May 6, 2020, 1:50 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यातरानडूकराने कारला दिलेल्या धडकेने कार मुख्य मार्गावरुन लांबवर फेकली गेली. या भीषण अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मोतीराम आत्राम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजूरा तालुक्यातील चनाखा मार्गावर मंगळवारी रात्री ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा...अबब... पुरुषांबरोबर आता महिलांच्याही दिल्लीत दारूच्या दुकानांसमोर रांगा

राजूरा तालुक्यातील कविठपेठ गावातील मोतीराम विठू आत्राम हे आपल्या परिवारासह राजूरा येथील नातेवाईक रवी कोडापे यांच्याकडे गेले होते. मंगळवारी रात्री उशीरा ते आपल्या परिवारासह रवी कोडापे यांचा कारने आपल्या गावाकडे निघाले. कारमध्ये मोतीराम आत्राम यांच्यासह साधना आत्राम, रुणाली आत्राम, समिक्षा आत्राम आणि रोहिणी आत्राम हे बसले होते. तर रवि कोडापे कार चालवत होते. चनाखा गावाजवळून जात असताना अचानक एका झूडपातून आलेल्या रानडूकराने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कार मुख्य मार्गावरुन लांब फेकली गेली. यात मोतीराम आत्राम यांचा जागीत मृत्यू झाला. तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच विरुर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठवले.

ABOUT THE AUTHOR

...view details