चंद्रपूर - जंगलातील जलस्त्रोत आटले असून अन्न व पाण्याच्या शोधात प्राण्यांनी मानवी वस्तीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट स्थिती धारण करत आहे. त्यामुळे चिमूर वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या पिटिचुवा नाल्यावर वनराई बंधारा बांधला आहे. वन्यप्राण्यांसाठी वनक्षेत्रातच पाण्याची सोय होणार आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र असुन वन्य जिव संरक्षण कायद्यामूळे व वनविभागाच्या विविध उपायाने वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. कमी झालेल्या पावसामुळे उन्हाळ्या अगोदरच नदी, नाले, तलाव कोरडे होतात. त्यामुळे वाघ, बिबट, अस्वल, हरीण अशा अनेक वन्य जीवांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पाण्याच्या शोधार्थ अनेक वेळा हे वन्यजीव मानवी वस्तीत वावर करताना दिसून येत आहेत.