महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ताडोबा बफर क्षेत्रात सर्पदंशाने मुलाचा मृत्यू, नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयात ठेवला मृतदेह

ताडोबा बफर क्षेत्रातील 16 वर्षीय मुलाचा रविवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. हा मृत्यू ताडोबातील बफर क्षेत्रात लावण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे झाला, असा आरोप करीत गावकऱ्यांनी या मुलाचा मृतदेह थेट वनविभागाच्या कार्यालयात आणून निषेध केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Child dies of snake bite in Tadoba buffer area of chandrapur
ताडोबा बफर क्षेत्रात सर्पदंशाने मुलाचा मृत्यू

By

Published : Jun 15, 2021, 7:27 AM IST

चंद्रपूर - ताडोबा बफर क्षेत्रातील 16 वर्षीय मुलाचा रविवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. हा मृत्यू ताडोबातील बफर क्षेत्रात लावण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे झाला. कारण त्याला त्वरित चंद्रपुरात नेता आले नाही, असा आरोप करीत गावकऱ्यांनी या मुलाचा मृतदेह थेट वनविभागाच्या कार्यालयात आणून निषेध केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ताडोबा बफर क्षेत्रात सर्पदंशाने मुलाचा मृत्यू..

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पद्मापूरपासून तर मोहूर्ली कोअर क्षेत्राच्या प्रवेशद्वारापर्यंत तब्बल 63 गतिरोधाक उभारण्यात आले आहेत. यापूर्वी या रस्त्यावर भरधाव वेगाने चालविणाऱ्या वाहनांमुळे अनेक वन्यजीवांचा नाहक बळी गेला. त्यावर तोडगा काढण्यासाठी हे गतिरोधाक उभारण्यात आले. मात्र, यामुळे या क्षेत्रात असणाऱ्या गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, अशी त्यांची तक्रार आहे. याच गतिरोधकांमुळे मुधोली या गावातील महिला सरपंचाचा गर्भपात झाला, तर एका महिलेचा अपघात झाल्याने ती गंभीर जखमी झाली, असा आरोप गावकऱ्यांचा आहे. त्यामुळे येथे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला. यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. याच दरम्यान रविवारी मुधोली या गावातील चेतन बबन जीवतोडे याला विषारी नागाने चावा घेतला. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याला चंद्रपुरात नेत असताना हा मृत्यू झाला. पदोपदी गतिरोधाक असल्याने त्वरित त्याला नेता आले नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी या मुलाचा मृतदेह थेट वनविभागाच्या कार्यालयात आणला. यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details